Breaking News

तळोजा मध्यवर्ती कारागृहाकडून डॉक्टरांचा सत्कार

पनवेल : प्रतिनिधी

कोविड19 च्या महामारीमध्ये पनवेल महापालिकेच्या वैद्यकिय पथकातील डॉक्टर्स व परिचारिकांनी कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव असताना देखील स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केल्याबद्दल तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीे पनवेल महापालिकेच्या डॉक्टरर्स व परिचारिकांचा प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार आणि मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड19 च्या महामारीमध्ये पनवेल महापालिकेच्या वैद्यकिय पथकातील डॉक्टर्स व परिचारिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून तळोजा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकरिता अ‍ॅन्टीजन व आरटीपीसीआर तपासणीचे वेळोवेळी आयोजन केल्याने, कारागृहातील कैद्यांमध्ये, तसेच करागृह कर्मचार्‍यांमध्ये कोविड19 चा प्रादूर्भाव झाला नाही. आतापर्यंत कारागृहामध्ये जवळपास साडेपाच हजार कैद्यांची अ‍ॅन्टीजन व आरटीपीसीआर टेस्ट्स करण्यात आल्या आहेत. अल्प प्रमाणात कोविड-19चा प्रादूर्भाव झालेल्या कैद्यांवर पालिकेच्या डॉक्टर्सनी वेळीच उपचार करून प्रसार रोखण्यास मदत केली. याचबरोबर कोविड 19चा प्रसार रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने कारागृहामध्ये विशेष लसीकरण सत्राचे आयोजन केले होते. महापालिकेने केलेल्या सहकार्याबद्दल तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे ज्येष्ठ अधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर, अतिरिक्त अधीक्षक दत्तात्रेय गावडे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी नागेश पाटील यांच्या हस्ते डॉ. भक्तराज भोईटे, डॉ. सुरेश पंडित, डॉ. रोमा म्हसकर, डॉ. महेश महाजन, डॉ. शुभम पाटील, तसेच महापालिकेच्या अधिपरिचारिका यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply