Breaking News

दरडग्रस्त तळीयेत सेवाकार्य करणार्‍या डॉक्टरांचा सत्कार

पनवेल : वार्ताहर

महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळून अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला.आबालवृद्ध या घटनेत मृत्युमुखी पडले. या वेळी संबधित मृतदेहांचे शवविच्छेदन करण्याचे काम पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विशेषतज्ज्ञ डॉ. बी. एम. काळेल व डॉ. प्रमोद पाटील यांनी केले. या डॉक्टरांचा सन्मान नुकताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या हस्ते करण्यात आले. अतिशय कठीण परिस्थितीत जमिनीखाली सापडलेल्या मृतदेहांची ओळख पटवून त्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचे काम डॉ. काळेल व त्यांच्या टीमने तळीये या ठिकाणी प्रामाणिकपणे केले. पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश जगताप यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या वेळी तळीये या ठिकाणी जिकिरीचे काम करणार्‍या डॉ. बी. काळेल व त्यांच्या टीमचा सत्कार करण्यात आला. तळीये या ठिकाणी जवळपास 53 शवविच्छेदन डॉ. काळेल यांनी केले. छिन्नविछिन्न अवस्थेत असलेल्या मृतदेहांची ओळख पटवणे, अंत्यविधीसाठी कायदेशीर बाबी पूर्ण करून तत्काळ कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम काळेल यांनी केले. याकरिता तीन दिवस पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथक तळीयेमध्ये होते. डॉ. काळेल यांनी पनवेलमध्ये कोविड काळात शेकडो मृतदेहांचे शवविच्छेदन केले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply