उपाययोजनांची घेतली माहिती
अलिबाग : जिमाका
पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे, तसेच महाडमधील तळीये या दरडग्रस्त भागाची जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी बुधवारी (दि. 25) पाहणी केली. या वेळी त्यांनी नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या व येथील नागरिकांना शासकीय सोयीसुविधा देण्याबाबत आश्वस्त केले.
जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी बुधवारी साखर सुतारवाडी, केवनाळे व तळीये, तसेच पूरग्रस्त महाड शहराचीही पाहणी केली. या वेळी त्यांनी प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या व यापुढे करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेतली. जि. प. सदस्य चंद्रकांत कळंबे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाड तहसीलदार सुरेश काशिद, पोलादपूर प्र. तहसीलदार समीर देसाई, गटविकास अधिकारी वृषाली यादव, तालुका आरोग्य अधिकारी गुलाबराव सोनवणे, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.