Thursday , March 23 2023
Breaking News

कबड्डीमहर्षी खंडूमामा बांदल यांचे निधन

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील टाकवे गावचे रहिवासी कबड्डीमहर्षी खंडूमामा महादू बांदल यांचे 90व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

खंडूमामांनी मुंबई महापालिकेत नोकरी करता-करता कबड्डी खेळ जपला. त्यांनी कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्याबरोबर लालबागच्या गणेश मित्र मंडळातर्फे कबड्डी खेळून नाव कमावले. ते कर्जतच्या त्याकाळी असलेल्या विजय स्पोर्ट्स क्लब संघातून कबड्डी खेळत असत. नामांकित कबड्डी संघांतील खेळाडूंना 50 वर्षांपूर्वी प्रशिक्षण देऊन त्यांनी तयार केले होते. खंडूमामांचे कबड्डीतील योगदान महत्त्वपूर्ण होते. त्यामुळेच कर्जत तालुक्यात कबड्डीचा खेळ नावारूपास आला.

Check Also

पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागताचा उत्साह

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रेत लहान मुलांसह महिला, …

Leave a Reply