पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्रजी माध्यम स्कूल अॅण्ड कॉलेजचा गणेश विनोदकुमार दुबे हा विद्यार्थी इयत्ता दहावीमध्ये तालुक्यामधून प्रथम आलेला आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनी दहावीमध्ये शाळेतून प्रथम आल्याबद्दल गणेशचा सत्कार भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला होता.
पनवेल पंचायत समितीच्या नुकत्याच झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेमध्ये तालुक्यातील इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा अभिनंदनाचा ठराव सभागृहात मांडण्यात आला. प्रथम क्रमांक कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्रजी माध्यम स्कूल अॅण्ड कॉलेजचा गणेश विनोदकुमार दुबे (98.60 टक्के), द्वितीय क्रमांक नवीन पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील विद्यार्थिनी साक्षी समीर भट (98.40 टक्के), तर तृतीय क्रमांक कळंबोली येथील म. ए. सो. ज्ञानमंदिर शाळेतील विद्यार्थी अमेय कृष्णा गावकर (98.00 टक्के) व कारमेल कॉन्व्हेंट हायस्कूलची विद्यार्थिनी प्रांजल दीपक कांबळे (98.00 टक्के) यांचा आलेला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.