Breaking News

प्रगतशील शेतकरी बनण्याचा प्रयत्न करा

उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांचे प्रतिपादन

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी

माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा या योजनेत सामील होऊन प्रगत शेतकरी बनण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी केले आहे.

शेतकर्‍यांना सक्षम करण्यासाठी महसूल व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्‍या माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा या योजनेचे प्रात्यक्षिक खालापूर तालुक्यातील होराळे गावातील शेतावर दाखविण्यात आले. त्या वेळी उपविभागीय अधिकारी नैराळे उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन करीत होते.

मोबाइल अ‍ॅपद्वारे डिजिटल सातबारा आणि ई-पीक पहाणी प्रकल्पामुळे पीक विमा व पीक कर्ज मिळणे अधिक सुलभ होणार असल्याचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी या वेळी सांगितले.

या कार्यक्रमास जि.प. सदस्य नरेश पाटील, भाई शिंदे, नायब तहसीलदार राजश्री जोगी, मंडळ अधिकारी तुषार कामत, नितीन परदेशी, अंकुश मोरे यांच्यासह शेतकरी, तलाठी, मंडळ अधिकारी उपस्थित होते.

या योजनेत पिकांच्या नोंदी घेण्यासाठी शेतकर्‍यांचा थेट सहभाग असल्याने पीकपाण्याची अचूक आकडेवारी मिळणार आहे. पीक शेतात उभे असतानाच पिकाची नोंद होणार आहे. त्यामुळे सातबारा अद्यावत होणे सुलभ व सोयीचे झाले आहे.

-इरेश चप्पलवार, तहसीलदार, खालापूर

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply