खोपोली : प्रतिनिधी
हनुमान जयंती, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद अशा विविध सणांच्या पार्श्वभूमिवर खोपोली शहरात नुकताच पोलीस निरिक्षक शिरिष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संचलन करण्यात आले. शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी खोपोली पोलीस ठाण्यातून संचलनास प्रारंभ करण्यात आला. शहरातलि समाजमंदिर रोड, मुख्य बाजारपेठ, लक्ष्मीनगरमार्गे वरची खोपोलीपर्यंत पोलिसांनी संचलन केले. कॉलनी मैदनात पोलीस संचलानाचा समारोप करण्यात आला. पोलीस निरिक्षक शिरिष पवार यांच्यासह 28 कर्मचार्यांनी या संचलनात भाग घेतला होता. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सक्षम असल्याचे दाखविण्यासाठी खोपोली शहरात संचलन केले असल्याची माहिती पोलीस निरिक्षक शिरीष पवार यांनी या वेळी दिली.