Breaking News

रोहा वनविभागाची धडक कारवाई; सुमारे सहा लाखांचे खैर लाकूड जप्त

धाटाव : प्रतिनिधी

मुंबई गोवा महामार्गावर माौजे विघवली फाटा येथे मोरया धाब्याजवळ शुक्रवारी (दि. 27) टाटा ट्रक क्रमांक एमएच 16 क्यू 7151 तपासला असता त्यामध्ये अवैध वृक्ष तोडीचा विनापरवाना वाहतूक केलेला खैर सोलीव माल 9.225 घमी किंमत 15,530 व ट्रक अंदाजे किंमत रुपये पाच लाख असे एकूण 5,15,530 इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचबरोवर उमेश जयसिंग ढवळे (रा. बारामती, वडगाव निंबाळकर) याला अटक करण्यात आली. अधिक तपास केला असता मौजे कशेणे गावाजवळ टाटा एस क्रमांक एमएच 06 बीजी 0089 मागील ताडपत्री उघडून पाहिले असता या टेम्पोमध्ये खैर सोलीव नग 13 घमी 0.237 किंमत 3374 रुपये व टेम्पो किंमत 60,000 असा एकूण 63,374 इतका बेवारस मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पुढील तपास सुरू आहे. रोहा वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलनचे कांबळी, वनरक्षक फिरत्या पथक अजिंक्य कदम, वनरक्षक शेणवईचे तेजस नरे, वनरक्षक मेढा योगेश देशमुख, वनरक्षक कुशेडे किशोर वाघमारे, माणगावचे वनपाल गायकवाड व राऊंड स्टाफ माणगाव आदींनी उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनखाली ही धडक कारवाई केली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply