Breaking News

मुरूड नगर परिषदेची वॉर्ड संख्या वाढणार?

मुरूड जंजिरा : प्रतिनिधी

मुरूड नगर परिषदेच्या निवडणुकीचा कालावधी डिसेंबर 2021 या महिन्यात संपत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषदेला प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. मुरूड नगर परिषद हद्दीमधील लोकसंख्या 12 हजार च्यावर असून या नगर परिषदेत 17 वॉर्ड अस्तित्वात आहेत. नवीन गणनेनुसार ही संख्या वाढली आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये नवीन मतदार वाढले असून आता मुरूड नगर परिषदेत 17 वॉर्डऐवजी 20 वॉर्ड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत मुरूड नगर परिषदेने अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. त्यानुसार निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करणे, प्रारूप वॉर्ड रचनेची कार्यवाही सुरू आहे. मुरूड नगर परिषदेची स्थापना नवाब काळात म्हणजे 1888 साली झाली. गेल्या अनेक वर्षांपासून मुरूड नगर परिषदेचे 17 वॉर्ड आहेत. सध्या मुरुड नगर परिषदेत वॉर्ड रचना, वॉर्डमध्ये असणार्‍या मतदारांची संख्या, प्रभाग रचना वगळून वॉर्ड रचना तयार करणे अशी कामे सुरू आहेत. आराखडा तयार करून निवडणूक आयोगाला पाठवण्यासाठी सर्व कर्मचारी कामात व्यस्त आहेत. याबाबत नगर परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की ही प्रशासनाची गोपनीय बाब असून याबाबत कोणतीही माहिती देता येणार नाही. निवडणूक आयोगाकडून पाठवलेला प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर माहिती देऊ.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply