Breaking News

माणगाव स्टेशनमधील समस्या सोडवाव्यात

रेल्वे प्रवासी संघटनेचे कोकण रेल्वेच्या प्रबंध निर्देशकांना निवेदन

माणगाव : प्रतिनिधी

तालुका रेल्वे प्रवासी संघटना आणि मेवाड युवक मंडळाच्या प्रतिनिधींनी बुधवारी (दि.1) माणगाव रेल्वे स्थानकांत कोकण रेल्वेचे प्रबंध निर्देशक संजय गुप्ता यांची भेट घेवून स्थानकातील प्रवासी समस्या व सुविधांबाबत चर्चा केली व निवेदन दिले.

कोकण रेल्वेचे प्रबंध निर्देशक संजय गुप्ता यांनी बुधवारी माणगाव रेल्वे स्थानकाला भेट देवून पहाणी केली. या वेळी तालुका रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रमेश शंकरलाल जैन व मेवाड युवक मंडळाचे अध्यक्ष मांगीलाल कुमावत यांनी त्यांची भेट घेतली व स्थानकातील समस्यांबाबत चर्चा करून त्यांना निवेदन दिले.

माणगाव रेल्वेस्थानकातील फलाट नं.1 वर नवीन रेलिंग करावे, पेव्हर ब्लॉक बसवावेत, प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करावी, फलाटावर शेड उभारण्यात यावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, पार्किंगच्या जागेत नूतनीकरण करण्यात यावे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन्ही बाजूला रेल्वे स्थानजाचे फलक लावावेत,  पीआरएस सुविधांचे डिजिटल बोर्ड बनवावेत, कोकणकन्या गाडी सुरू करून तिला माणगाव येथे थांबा द्यावा, मंगला एक्स्प्रेस (12617/12618), जनशताब्दी एक्स्प्रेस(12051/12052), मस्त्यगंधा एक्स्प्रेस (12620), मंगलोर-मुंबई या गाड्या सुरू कराव्यात अदी मागण्यांचे निवेदन या वेळी कोकण रेल्वेचे प्रबंध निर्देशक संजय गुप्ता यांना देण्यात आले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply