Breaking News

पेण-खोपोली बायपासवर कार व ट्रकची ठोकर

पेण : प्रतिनिधी

पेण-खोपोली बायपासवरील गणपतीवाडी येथे मंगळवारी (दि. 31) कार आणि ट्रकची ठोकर झाली.  या अपघातात कार चालक सुरेश कदम (रा. गणपतीवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला.

पेण-खोपोली बायपास मार्गावर पनवेलच्या दिशेने जाणारी कार (एमएच-06,बीई-3242) आणि समोरून येणार ट्रक (एमएच-12,आरएन-2393) यांची मंगळवार समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात कार चालक सुरेश कदम  यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर ग्रामस्थांनी काहीकाळ वाहतूक रोखून धरली होती. या वेळी पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यात बाचाबाचीदेखील झाली. या अपघाताची नोंद पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply