Breaking News

पनवेल परिसरात दिवाळीनिमित्त मैफिली

प्रसिद्ध गायक-गायिकांच्या सुरेल कार्यक्रमांची पर्वणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी पहाट आणि दिवाळी संध्या अर्थात सांगीतिक मेजवानीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेल परिसरात आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने गायन क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकरांच्या सुरेल गायनाचा आस्वाद रसिकांना मिळणार आहे.
श्री. रामशेठ ठाकूर विचार मंच खारघर यांच्या वतीने 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता खारघरमधील स्वप्नपूर्ती सोसायटी येथे दीपसंध्या हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी ‘सूर नवा ध्यास नवा’फेम प्रणय पवार, दिपाली देसाई, अभिषेक नलावडे या प्रसिद्ध गायकांचे गायन सादरीकरण होणार आहे. 1 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.30 वाजता पनवेल महापालिकेच्या वतीने पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे आनंद गंधर्व पं. आनंद भाटे आणि सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांचे सुमधुर गायन असलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालिका दीप्ती भागवत या करणार आहेत.
अल्पावधीतच आपल्या गायकीचा ठसा जनमानसाच्या मनावर उमटवणार्‍या दिल्ली येथील सुप्रसिद्ध गायिका मैथली ठाकूर यांचे सुश्राव्य गायन श्री. रामशेठ ठाकूर विचार मंच खारघरच्या वतीने 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता खारघर सेक्टर 12मधील गावदेवी मैदान येथे, तर 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता कळंबोलीमधील रोडपाली बस डेपो येथे शिवशंभो सामाजिक विकास मंडळ कळंबोलीद्वारा दिवाळी संध्या हा सांस्कृतिक कार्यक्रमातून होणार आहे. या सर्व सांस्कृतिक मेजवानींचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply