Breaking News

पनवेलमध्ये चालक दिन साजरा

पनवेल : वार्ताहर

शासनाने 17 सप्टेंबर हा चालक दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानुसार पनवेलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन ठोंबरे व रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने चालक दिन साजरा करण्यात आला. या वेळी एसटी महामंडळाच्या चालकांचा, रुग्णवाहिका चालकांचा, अग्निशमन दलाच्या चालकांचा, ऑटोरिक्षा चालकांचा,    पनवेल महापालिकेतील, तसेच नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील वाहन चालकांना कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता पूर्वक सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक संदीप कोतकर, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन सकपाळ, एसटी महामंडळाच्या पनवेल आगाराचे व्यवस्थापक विलास गावडे, पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत आदींसह रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. अभय गुरसाळे, सचिव संतोष घोडींदे, संचालक सुदीप गायकवाड, प्रोजेक्ट प्रमुख विवेक खाडये, खजिनदार शैलेश पोटे, क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. हितेन शाह, शिरीष वारांगे, बी. जी. पाटील, ऋषी बुवा, नितेश सुनका, सायली व श्रीकांत सातवळेकर, रोटरी सदस्य सहभागी झाले होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply