कळंबोली ः रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र नवरत्न युवा संघटनेच्या वतीने दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार सोहळा रविवारी (दि. 28) कळंबोली येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कळंबोली सेक्टर 1 ई येथील नवीन सुधागड हायस्कूल हॉलमध्ये झालेल्या सोहळ्यास माजी नगरसेविका मोनिका महानवर, भाजप नेते अशोक मोटे, देविदास खेडकर, नवरत्न युवा संघटनेचे कळंबोली शहराध्यक्ष रूपेश सावंत, दिपाली केकाण, उपाध्यक्ष सुप्रिया वालणकर, कामोठे शहराध्यक्ष शुभांगी गोरे, विशाल बोबडे, अरुण पाटोळे, युवा उद्योजक भरत नारनवर, अॅड. अनिकेत मोहिते यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आमदार प्रशांत ठाकूर यांनी, ज्या गुरूंनी आपल्यावर संस्कार केले त्यांचे ऋण सतत मान्य करत राहणे ही आपली संस्कृती आहे, असे प्रतिपादन केले. या वेळी त्यांच्या हस्ते रील स्टार शुभम खरिवले आणि जय भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
Check Also
नमो चषकात कबड्डीचा थरार!
पुरुष गटात नवकिरण, तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स विजयी उलवे नोड : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ …