Monday , February 6 2023

कोरोना लसीकरणांसाठी सोसायट्यांना आवाहन

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिका काही दिवसांपासून लसीकरणांवर भर देत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी पालिका क्षेत्रातील सोसायट्यांनी पुढाकार घेऊन आपल्या सोसायटीतील नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख केले आहे. शनिवारी झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत लसीकरणाबरोबरच पालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आयुक्तांनी आढावा घेतला.

महापालिकेला लस साठा मुबलक प्रमाणात होत आहे. पालिका क्षेत्रातील सोसायट्यांनी डॉक्टरर्स, परिचारिका, जागा उपलब्ध करून दिल्यास त्यांचे सोसायटीमध्येच लसीकरण करून देण्यात येईल, यासाठी सोसायट्यांनी पुढे यावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. सिडकोकडून भूखंड हस्तांतरीत करून घेणे, बेघरांसाठी निवारा हॉल भाडे तत्वावर घेणे, विहीरींचा गाळ काढणे, अनधिकृत बांधकाम अशा विविध कामांचा या वेळी आढावा घेण्यात आला.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply