Breaking News

पालीमध्ये पसरलेय कचर्याचे साम्राज्य

घाण व दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील पालीत कचर्‍याची समस्या गंभीर झाली आहे. नगरपंचायतीच्या घंटागाड्या फिरूनदेखील काही नागरिक फुटक्या कचराकुंड्या आणि रस्त्यावर कचरा टाकत आहेत. रस्त्यावर येणारा हा कचरा नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक ठरत आहे.

कचराकुंडीत काही खाद्य मिळेल यासाठी गुरे कचर्‍यातील प्लास्टिक पिशव्या खात आहेत, परिणामी गुरांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. सांडपाण्याचा निचरादेखील योग्य पद्धतीने होत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी भरुन राहिली आहे.

पालीतील कचरा समस्येवर मात करण्यासाठी तत्कालीन ग्रामपंचायतीतर्फे चार वर्षांपूर्वी घंटागाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. सध्या नगरपंचायतीकडे चार घंटागाड्या कार्यरत आहेत. फक्त रविवारीच घंटा गाड्या येत नाहीत, त्यानंतर सोमवारी अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या व रस्त्याच्या कडेला कचर्‍याचा ढीग पडलेला असतो. तर इतर दिवशीदेखील हीच परिस्थिती पहायला मिळते. घंटागाडी कचरा घेऊन गेल्यानंतर झालेला कचरा काही दुकानदार तसेच अनेक नागरिक  लागलीच कचराकुंडी व रस्त्यावर फेकतात. यामुळे जागोजागी कचर्‍याचे ढिगार पहायला मिळतात. त्यातून अन्न शोधण्यासाठी भटकी कुत्री व जनावरे जातात आणि हा कचरा रस्त्यावर किंवा बाजुच्या गटारात पडतो. त्यामुळे गटारे तुंबून आणखी समस्या उद्भवते.

अपुरे सफाई कर्मचारी

पाली नगरपंचायतीकडे अधिकृत 15 ते 18 सफाई कर्मचारी आहेत.  प्रत्यक्षात जेमतेम 9-10 कर्मचारी रोज कामावर येतात. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येतो. परिणामी सर्वच ठिकाणची साफसफाई करणे त्यांना शक्य होत नाही.

आणखी घंटागाड्या हव्यात

सध्या कचरा उचलण्यासाठी नगरपंचायतीकडे एक ट्रॅक्टर, दोन छोटा हत्ती घंटा गाड्या व एक अ‍ॅपे आहे. यातील एक घंटागाडी छोटी व बंदिस्त आहे. त्यामुळे तिच्यात अधिक कचरा सामावत नाही. तसेच पालीचा विस्तार वाढत असल्याने अधिकच्या घंटागाड्यांची आवश्यकता आहे.

नजीकच्या काळात पालीतील सर्व कचराकुंड्या बंद करणार आहोत. त्यामुळे नागरिकांनी घंटागाडी मध्येच कचरा टाकावा. नागरिकांनी शिस्त पाळण्याची आवश्यकता असून सर्वतोपरी सहकार्य करावे.

-दिलीप रायण्णावार, प्रशासक, पाली

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply