आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघात होत असलेला विकास पाहून त्या विकास कामावर प्रभावित होऊन कोंडीचीवाडी येथील शेकापच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि.19) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामध्ये महादू भूकरे, काना दोरे धर्मा भूकरे, पद्या ठाकरे, महादू उधडा, कान्ह्या ठाकरे, अनंता दोरे, नारायण दोरे, ग्रा. पंच्या माजी सदस्या यमुना दोरे, शांती भूकरे, सोम्या भूकरे, गणपत ठाकरे, दामू उघडा अरुणा भूकरे, जानकी भूकरे आदी शेकापच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे प्रदेश सदस्य अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, नेरे विभागीय अध्यक्ष भूपेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य राज पाटील, वाजे ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र भालेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य तनुजा दोरे, ग्रामपंचायत सदस्य उषा वारगडा, माजी उपसरपंच काळूराम वाघे, जोमा निरगुडे, पद्माकर चौधरी, चाऊशेठ चौधरी, पत्रकार गणपत वारगडा, ग्रामपंचायतीचे सरपंच सिताराम चौधरी, उपसरपंच जनार्धन निरमुरे, चिपळेचे माजी सरपंच रमेश पाटील, राजेश भोईर, नारायण मढवी, कमळ चौधरी, किसन चौधरी, विकास भगत, हर्षदा चौधरी, विष्णू सपरा, श्याम भालेकर, विष्णू पारधी, माही कडवी, लक्ष्मण चौधरी, गणेश शीर, दिलीप पाटील, किसन चौधरी, कमळू चौधरी आदी उपस्थित होते.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper