Breaking News

माथेरानमध्ये युनियन बँकेचा भोंगळ कारभार; खातेदार त्रस्त

माथेरान : प्रतिनिधी

युनियन बँकेच्या माथेरान शाखेची ऑनलाईन सेवा वारंवार बंद असते, तसेच नेमक्या वीकेण्डला बँकेचे एटीएम बंद पडत असल्याने स्थानिक नागरिक व पर्यटक त्रस्त झाले आहेत.

माथेरानमध्ये एकमेव असलेल्या युनियन बँकेच्या भोंगळ कारभारामुळे येथील नागरिक व पर्यटक काही वर्षापासून हैराण झाले आहेत. माथेरानमध्ये या बँकेचे  एकमेव एटीएम केंद्र आहे. ते नेहमी वीकेण्डला बंद पडते. त्यामुळे इथे येणार्‍या पर्यटकांना पैसे काढता येत नाहीत. त्यामुळे ते खरेदी करू शकत नाहीत. त्याचा फटका येथील छोठे मोठे हॉटेल्स, स्टॉल, दुकानें, लॉजिंग यांना बसतो, तसेच बँकेमधील ऑनलाईन सेवा वारंवार बंद राहत असल्यामुळे नागरिकांना पासबुक एन्ट्री मिळण्यास विलंब होतो, तसेच नागरिकांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. या विरोधात अनेक नागरिकांनी तक्रारी करूनसुद्धा या बँकेच्या सेवेत सुधारणा झालेली नाही. जैसे थे आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply