Breaking News

ओबीसींचे आरक्षण रद्द केल्याविरोधात खोपोलीतून राज्य शासनाला निवेदन

खोपोली : प्रतिनिधी            

ओबीसी समाजाची जनगणना करून स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत द्यावे तसेच मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाच्या निवेदनामधील मागण्या मंजूर कराव्यात अशा मागण्यांची दोन वेगवेगळी निवेदने खोपोली शहरातील समस्त ओबीसी समाजाच्या वतीने माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांच्या उपस्थितीत खालापूर तहसीलदार इरेश चपल्लवार यांना देण्यात आली. माजी नगरसेवक राजेंद्र फक्के, समाजिक कार्यकर्ते विनायक तेलवने, महेश काजळे, इश्वर कासार, सचिन मोरे, मोहन केदार, गोपाळ बावस्कर, विकास खुरपुडे, अनिल सानप, प्रमोद पिंगळे, राहूल आंग्रे यांच्यासह खोपोली शहरातील विविध पक्षातील पदाधिकारी व सामाजिक संघटनांंचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. ओबीसी समाजाची जनगणना करून ओबीसीचे आरक्षण पूर्ववत द्यावे. तसेच राज्य सरकारने समस्त ओबीसी समाजातर्फे केलेल्या 13 मागण्यांना तात्काळ मंजुरी द्यावी, अशा मागणीचे निवेदनपत्र तहसीलदारांकडे दिले असल्याची माहिती दत्ताजीराव मसुरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply