आमदार महेश बालदी यांचे गौरोद्गार रस्ता काँक्रटीकरणाचे भूमिपूजन
उरण : वार्ताहर
उरण नगर परिषद करीत असलेले कार्य हे कौतुकास्पद असून सर्व नगरसेवक व नगरसेविकेंचे मी अभिनंदन करतो, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी केले. उरण नगर परिषद हद्दीतील सातरहाटी व हरीपांडव येथे रस्ता काँक्रटीकरण कामाचे भूमिपूजनाच्या वेळी ते बोलत होते.
आमदार महेश बालदी, नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या प्रयत्नाने उरण नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र. 8 मधील सातरहाटी व हरी पांडव पथ (उरण) रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन मंगळवारी ( दि. 19) सकाळी 11 वाजता आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार महेश बालदी या वेळी म्हणाले की, उरण हे बदलत शहर आहे. उरण हे 21व्या शतकातील शहर आहे. दीड वर्षांनी आपल्याकडे रेल्वे लाईन येणार आहे. उरण बायपासचे इंनव्ह्यमेन्ट क्लियर झाल आहे. लवकरच ते होईल.
उरण या बदलत्या शहराचे आपण सर्व साक्षीदार आहोत. आज नवीन रस्त्याचे नवीन काम चालू होत आहे. उरण नगरपरिषदच्या नगरसेवक, नगरसेविकेंचे मी अभिनंदन करतो. तुम्ही केलेली मेहनत नक्कीच समाजाच्या भल्या करीता आहे. असेच काम पुढील काळातही सुरू राहिल हि अपेक्षा ठेवतो.
भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, प्रभाग क्र. 8च्या नगरसेविका प्रियंका पाटील, दमयंती म्हात्रे, आशा शेलार, जानव्ही पंडीत, स्नेहल कासार, नगरसेवक धनंजय कडवे, राजेश ठाकूर, नंदु लांबे, भाजप शहर महिला अध्यक्ष संपूर्णा थळी, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, अल्पसंख्यांक रायगड जिल्हा अध्यक्ष जसिम गॅस, रोहित पाटील, निलेश कदम,जगदीश पाटील, जसिम गॅस, अशोक पालकर, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, हितेश शाह, सुरज ठवले, सर्व नगरसेवक, नगरसेविका, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.