दुबई : टीम इंडियाची सलामीवीर स्मृती मंधाना हिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) 2019 या वर्षातील एकदिवसीय आणि टी-20 संघात स्थान मिळाले आहे.वर्षभरात खेळल्या जाणार्या क्रिकेट सामन्यात चांगली कामगिरी करणार्या सर्वोत्तम खेळाडूंचा मिळून आयसीसी वर्षाअखेरीस एक संघ जाहीर करते. त्यातील एकदिवसीय आणि टी-20 अशा दोन्ही संघांत भारताच्या मंधानाचा समावेश करण्यात आला आहे. स्मृतीव्यतिरिक्त शिखा पांडे, झुलन गोस्वामी आणि पूनम यादव यांचाही वर्षाच्या एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे, तर दीप्ती शर्मा आणि राधा यादव या दोघींनी टी-20 संघात स्थान मिळवले आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper