पनवेल ः रामप्रहर वृत्त
डॉ. सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या 78व्या जयंतीनिमित्त उमूर सेहत अंजुमन-ए-नजमी यांच्या वतीने रविवारी (दि. 31) पनवेलमध्ये वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद लाभला. पवित्रतेच्या आनंद आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार दाऊदी बोहरा समुदाय केवळ समुदायाच्या सदस्यांसाठीच नव्हे; तर संपूर्ण मानवजातीसाठी चांगल्या आरोग्यासंदर्भात जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित करीत असते. असाच एक यशस्वी उपक्रम म्हणजे वॉकथॉन. पनवेल टपाल नाका येथील मस्जिद ते करंजाडे आणि पुन्हा फिरून मस्जिद अशी वॉकथॉन झाली. या वॉकथॉनमध्ये 550हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही यात सहभाग घेतला. त्याचप्रमाणे दाऊदी बोहरा समाजाचे मुर्तझा हसनी, उमूर सेहतचे व्यवस्थापक सैफुद्दीन भारमल, सचिव अलियाकबर सदरीवाला आदी उपस्थित होते. या वेळी प्रमाणपत्र देण्यात आले.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …