Breaking News

पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी

हाँगकाँग : वृत्तसंस्था

हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उत्तम कामगिरी करीत पी. व्ही. सिंधूने दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूने 19व्या स्थानावर असलेल्या कोरिआच्या किम गा ऊन हिला 36 मिनिटे चाललेल्या सामन्यात पराभूत केले. सिंधूने प्रतिस्पर्धी खेळाडूला 21-15, 21-16 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले.

त्याआधी सायना नेहवाल आणि समीर वर्मा या भारतीय बॅडमिंटनपटूंचे हाँगकाँग ओपन स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले होते. आठव्या मानांकित सायनाला चीनच्या कै यान यान ने 13-21, 20-22 अशा दोन सेट्समध्ये पराभूत केले. गेल्या सहा स्पर्धांचा

इतिहास पाहता पाच स्पर्धांमध्ये सायना पहिल्याच फेरीतून बाहेर पडली आहे, तर पुरुषांमध्ये 16व्या मानांकित समीर वर्माचे आव्हान चीन तैपेईच्या वँग त्झू वईने अवघ्या 54 मिनिटांत परतवून लावले. पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागण्याची समीरची ही तिसरी वेळ ठरली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply