मुंबई : भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी केली आहे. याबद्दल चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. ‘प्रथम, त्यानंतर पक्ष व शेवटी स्वतः
हा भाजप परिवाराचा मंत्र मनात ठेवूनच आजवर राष्ट्रसेवेचा वसा जपत आलो आहे. पक्षाने ज्या ज्या जबाबदार्या सोपवल्या त्यातील प्रत्येक जबाबदारी सर्वतोपरी यशस्वीरित्या पार पाडली.
आज प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. ती कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या संघटन शक्तीच्या बळावर निष्ठापूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न करेन, असे चव्हाण यांनी म्हटलेय.
Check Also
पनवेल महापालिका क्षेत्रातील न्हावाशेवा टप्पा 3 पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागांना पाणीपुरवठा करणार्या न्हावाशेवा टप्पा 3 …