Breaking News

काँग्रेस नेत्याकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

बंगळुरू ः वृत्तसंस्था

काँग्रेसचे अनेक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींचं कौतुक करणार्‍या काँग्रेस नेत्यांमध्ये आणखी एक नाव जोडले गेलेय ते म्हणजे कर्नाटकचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद माधवराज यांचे. प्रमोद माधवराज यांनी पद्म पुरस्कारांबाबतचा ट्रेंड बदलल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे. काँग्रेस नेते माधवराज यांनी विश्वेश तीर्थ स्वामींना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार बहाल केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले असून भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आल्यापासून पद्म पुरस्कार प्रदान करण्याच्या ट्रेंडमध्ये बदल झालाय, असे शुक्रवारी एका कार्यक्रमात भाषण देताना सांगितले. यापूर्वी अर्ज करणार्‍यांना हा सन्मान दिला जात होता, मात्र आता मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर हा ट्रेंड बदललाय. जे पात्र आहेत त्यांनाच पद्म पुरस्कार दिले जात आहेत. कुणी चांगले काम केले, तर त्याची स्तुती करायलाच हवी. मी जरी दुसर्‍या पक्षाचा (काँग्रेस) असलो, तरी पंतप्रधानांच्या चांगल्या कामाचे कौतुक मला आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी आध्यात्मिक जगतातील अतुलनीय योगदानाबद्दल उडुपीतील पेजावर मठाचे विश्वेश्व तीर्थ स्वामी यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान केला. हा पुरस्कार विश्वप्रसन्ना यांनी स्वीकारला. त्यांच्या स्वागतासाठी गुरुवारी उडुपीत आयोजित कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्याने पद्म पुरस्काराबाबत पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारचे कौतुक केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply