पनवेल : रामप्रहर वृत्त
राष्ट्रीय जनजाती गौरव दिन आणि महान जनजातीय स्वतंत्र सेनानी तथा सनातन संस्कृती रक्षक भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस सोमवारी (दि. 15) पनवेलमध्ये साजरा झाला. त्यानिमित्त जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीने गाढेश्वर येथे बाईक रॅली आयोजीत करण्यात आली होती.
रॅलीनंतर गावामध्ये आयोजीत केलेल्या सभेत रायगड जिल्हा जनजाती सुरक्षा मंचाचे अध्यक्ष सुदाम पवार यांनी इंग्रजांविरुद्ध दिलेल्या आणि हुतात्मा झालेल्या आदिवासी वनवासी भागातील हुतात्म्यांचे बलिदान यावर समर्पक असे भाष्य केले. तसेच या कार्यक्रमात आजूबाजूच्या खेड्यातील पाड्यातील आदिवासी नृत्य प्रकार सादर करण्यात आले.