Breaking News

राजभवनात लहान मुलांसाठी रंगला कट्टी बट्टी कार्यक्रम

गंधार गौरव पुरस्कारांचेही वितरण

मुंबई : प्रतिनिधी

बालदिनाचे औचित्य साधून बालरंगभूमीसाठी कार्य करणार्‍या गंधार कला संस्थेतर्फे लहान मुलांच्या कट्टी बट्टी या कार्यक्रमाचे तसेच गंधार गौरव पुरस्कार सोहळ्याचे राजभवन येथे रविवारी (दि. 14) आयोजन करण्यात आले होते.

या वेळी बालरंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अभिनेते अतुल परचुरे यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते गंधार गौरव पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आला, तर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लहान मुलांना संस्कार देण्याचे स्थायी कार्य कुटुंब, समाज व सांस्कृतिक संस्थांकडून होत असते. या संस्कारांच्या माध्यमातून समाज घडतो व समाजाच्या माध्यमातून राष्ट्र निर्माणाचे कार्य होते, असे प्रतिपादन या वेळी राज्यपाल कोश्यारी यांनी केले. तसेच ’कट्टी बट्टी’ या कार्यक्रमात लहान मुलांनी सादर केलेल्या बालभारती पुस्तकातील बडबडगीतांना राज्यपालांनी कौतुकाची थाप दिली व बालनाट्य चमूला वीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

या कार्यक्रमास आमदार आशिष शेलार, आमदार संजय केळकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की व गंधारचे अध्यक्ष मंदार टिल्लू व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते दिग्दर्शक जयंत पवार, निवेदिका अनुश्री फडणीस, संगीतकार ओंकार

घैसास व प्रकाश पारखी यांना गंधार युवा गौरव पुरस्कार देण्यात आले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply