Breaking News

महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नेते, पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

पिंपरी : रामप्रहर वृत्त
मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दि. 22) आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने महायुतीमधील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
खासदार श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विधान परिषदेतील भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अमर साबळे, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार सुनील शेळके, आमदार अण्णा बनसोडे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, माजी मंत्री बाळा भेगडे आदी उपस्थित होते.
अर्ज भरण्यासाठी आकुर्डी येथील खंडोबा माळ ते प्राधिकरण या मार्गावरून रॅली काढण्यात आली. या वेळी भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, भाजप तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, युवा नेते हॅप्पी सिंग, दिनेश खानावकर, अभिषेक भोपी, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, धीरज ओवळेकर, तेजस जाधव, देवांशु प्रभाळे, देवा गोवारी, किरण सोलकर, सुनील गोवारख, जय गोवारी, कोमल कोळी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आणि सर्वांचे आभार मानले.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply