Breaking News

भरारीसाठी पंखांना बळ हवे!

तुषार पवारांचे अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर (आकांकागुवा) मोहिमेसाठी मदतीचे आवाहन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्लायंबिंग, ट्रेकिंगसारख्या साहसी खेळाची आवड जोपासणारे तुषार पवार यांनी 26 जानेवारी 2022 रोजी अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट आकांकागुवा (6962 मीटर) सर करण्यासाठी मोहीम आखली आहे. यासाठी येणारा खर्च हा 6 लाखांपर्यंत असून पवार यांनी त्यांना मदत करण्यासाठी आवाहन केले आहे. तुषार पवार यांनी महाराष्ट्रात पोलीस म्हणून सेवा बजावत गिर्यारोहणसारख्या साहसी खेळामध्ये देशातच नव्हे; तर जागतिक पातळीवर महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव उंचावण्याची संधी मिळत आहे. त्यासाठी आवश्यक शारिरीक, मानसिक व अटलबिहारी वाजपेयी गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था मनाली येथून तांत्रिक प्रशिक्षण घेऊन आवश्यकती कौशल्य त्यांनी प्राप्त केली आहेत. पवार यांनी आतापर्यंत 26 जानेवारी 2019 रोजी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो (5895 मीटर), 15 ऑगस्ट 2019 रोजी युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूस (5642 मीटर), 25 सप्टेंबर 2021 रोजी उत्तराखंडमधील भागीरथी 2 शिखर (6512 मीटर) या मोहिमा यशस्वी केल्या आहेत. त्याचबरोबर सह्याद्रीतील गडकिल्ले, सुळके यशस्वीपणे पार केले आहेत. पवार हे पोलीस खात्यामध्ये रुजू झाल्यापासून पोलीस खेळामध्येही उत्कृष्टपणे खेळत आले आहेत. फोर्स वन कमांडो ट्रेनिंग सेंटर पुणे येथे प्रशिक्षणामध्ये तीन गोल्ड मेडल मिळवून ते बेस्ट कमांडो झाले आहेत. पवार यांच्या या कामगिरीतून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, हाय रेन्ज बुक ऑफ रेकॉर्ड, लिमका बुक ऑफ रेकॉर्ड असे अनेक राष्ट्रीय विक्रम त्यांच्या नावे झाले आहेत. भविष्यात 7 खंडातील 7 सर्वोच्च शिखर सर करण्याचा मानस असून येणाऱ्या मे 2022 रोजी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (8848 मीटर) हे शिखर सर करणार आहेत. तरी 26 जानेवारी 2022 च्या आकांकागुवा मोहिमेसाठी दानशूर, खेळप्रेमी व्यक्ती, संस्थांकडून मदत मिळण्यासाठी त्यांनी आवाहन केले आहे. मदत 7620242839 या क्रमांकावर फोन पे अथवा गुगल पे करावी. अ‍ॅक्सिस बँक अकाऊंट नंबर 917010039276670, आयएफसी UTIB0000072, ब्रँच वाशी आहे, अशी माहिती तुषार पवार यांनी दिली.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply