दुबई ः वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणार्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये भारतीय संघाचा पहिला सामना 6 मार्च रोजी कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
विश्वचषक स्पर्धेची सुरुवात न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 4 मार्च रोजी होणार्या सामन्याने होईल. 31 दिवस चालणार्या या स्पर्धेत एकूण 31 सामने खेळवले जाणार असून त्यात आठ संघ सहभागी होणार आहेत. पहिला उपांत्य सामना 30 मार्च रोजी, दुसरा उपांत्य सामना 31 मार्चला तर विजेतेपदाचा सामना 3 एप्रिलला होणार आहे.
स्पर्धा राऊंड रॉबिन स्वरूपात खेळली जाईल, ज्यात आठही सहभागी संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीत जिथे पहिल्या क्रमांकाच्या संघाला तिसर्या क्रमांकाच्या संघाशी आणि दुसर्या क्रमांकाच्या संघाला चौथ्या क्रमांकाच्या संघाचा सामना करावा लागेल.
आससीच्या म्हणण्यानुसार ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघ आयसीसी महिला चॅम्पियनशिप 2017-20मधील त्यांच्या स्थानांवर आधारित या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत, तर न्यूझीलंड या स्पर्धेचे यजमान असल्यामुळे आपोआप पात्र ठरला आहे. या विश्वचषकाचे सामने लीग फॉरमॅटमध्ये खेळवले जातील
भारतीय संघाचे साखळी सामने
* 6 मार्च, भारत विरुद्ध पाकिस्तान, तौरंगा
* 10 मार्च, भारत विरुद्ध न्यूझीलंड, हॅमिल्टन
* 12 मार्च, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, हॅमिल्टन
* 16 मार्च, भारत विरुद्ध इंग्लंड, तौरंगा
* 19 मार्च, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ऑकलंड
* 22 मार्च, भारत विरुद्ध बांगलादेश, हॅमिल्टन
* 27 मार्च, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, क्राइस्टचर्च
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …