पनवेल : रामप्रहर वृत्त
रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड सायन्स खारघर येथे शनिवारी (दि. 3) झालेल्या आंतरशालेय सायन्स प्रश्नमंजुषा स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता बारावी सायन्सच्या दीपक माळी व सुनील चव्हाण या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. पारितोषिक रक्कम रुपये 3000 रोख व सन्मानचिन्ह देऊन या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव डॉ. एस. टी. गडदे, सहसचिव भाऊसाहेब थोरात, प्राचार्य प्रशांत मोरे, पर्यवेक्षक अजित सोनवणे, पर्यवेक्षिका स्वाती पाटील, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.