ताश्कंद ः वृत्तसंस्था
भारताचा वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. ताश्कंद येथे झालेल्या या स्पर्धेत 109 वजनी गटात लवप्रीतने एकूण 348 किलो (161+187) वजन उचलत पदकाची कमाई केली. भारत राष्ट्रकुल स्पर्धेत आणि जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेतही सहभागी आहे. लवप्रीतखेरीज राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत अनुराधा पवनराज हिने महिलांच्या 87 किलो वजनीगटात कांस्यपदक निश्चित केले. तिने एकूण 195 किलोचा (90+105) भार उचलला. राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये भारताने आतापर्यंत 14 पदके आपल्या नावावर केली आहेत. यात तीन सुवर्णपदकांचाही समावेश आहे, तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला आतापर्यंत एकच पदक मिळवता आले आहे. भारताने क्लीन आणि जर्क प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली आहे.