Breaking News

रायन मिनीथॉनला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर
रायन मिनीथॉन ही 174वी स्पर्धा सेंट झेवियर हायस्कूल व रायन इंटरनॅशनल हायस्कूलचे चेअरमन डॉ. ए. एफ. पिंटो यांच्या नेतृत्वाखाली झाली. संपूर्ण भारतभर ही स्पर्धा आयोजित केली जाते. मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यात खेळाचे महत्त्व जागृत करणे हा या स्पर्धेमागचा मुख्य हेतू आहे. यंदा मुंबईच्या बोरिवलीतील सेंट लॉरेन्स हायस्कूल व रायन ख्रिश्चन हायस्कूल येथे आयोजित या स्पर्धेत 13 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत वयोगटानुसार तीन गट करण्यात आले होते. त्यात 12 वर्षांखालील मुला-मुलींसाठी 2 किमी, 14 वर्षांखालील मुला-मुलींसाठी 3 किमी आणि 16 वर्षांखालील मुला-मुलींसाठी चार किमी असे अंतर होते. प्रत्येक वर्गातील सहा विजयी स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. सर्वाधिक गुण मिळविणार्‍या स्पर्धकाला चॅम्पियन ट्रॉफी देण्यात आली.
रायन ग्रपच्या संचालिका डॉ. स्नेहल पिंटो यांनी झेंडा दाखवून मिनीथॉनचा शुभारंभ केला. या वेळी सत्य प्रकाश, शिवकुमार गुप्ता, पीआय प्रकाश जाधव, किरण शिंदे, विनू पॉल, मनोहर माने, मोहन पिल्लई, लेफ्टनंट अ‍ॅण्ड कमांडर देबाशिष त्रिपाठी, सृष्टी ठाकूर, जॉय बॅनर्जी, पी. के. खासिद, एस. एच. यादव, किशोर यादव, नेहा श्रीसागर, दीपक शिंदे, सुशांत जाधव, प्रांजल विजयकुमार, आकाश सिंग, जोसेफ माँटेरीओ, श्रेयस दिलीप खाडे, रोहित असले, अनुप ठाकूर, संग्राम फोफेरकर, अनिल कोरवी, ऋषिकेश करगुटकर, थॉमस कॅस्टिनिओ, आनंद माने, अभिषेक वाघेला, सिद्देश शर्मा, धु्रव भटनागर, प्रभजोत सिंग, कीर्ती विजय, खालीद शेख, श्रुती भडजत्या, रदाये अविनाश, मुकेश शर्मा, रॉन्स बन्टवल, आर. के. सिंग, सचिन सावंत, नामदेव काशिद, उपेंद्र पंडित, सुभाष यादव, केतन पटेल, फेरो अश्विन आदी उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply