Breaking News

भारत-पाकिस्तान महामुकाबला रंगणार; आशिया चषक स्पर्धेत 25 डिसेंबरला लढत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा पाकिस्तानकडून दारुण पराभव झाला. आता या पराभवाचा वचपा काढता येऊ शकतो. यूएईमध्ये 23 डिसेंबरपासून अंडर-19 आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 25 डिसेंबरला म्हणजेच ख्रिसमसच्या दिवशी दुबईत टक्कर होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) आयोजित केलेल्या स्पर्धेत आठ संघ सहभागी होत आहेत. ते दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. अ गटात भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि यूएई यांना स्थान मिळाले आहे, तर बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि कुवेत हे ब गटात आहेत. प्रत्येक संघाला तीन साखळी सामने खेळायचे असून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत जातील. म्हणजेच भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत गेले, तर पुन्हा एकदा अंतिम फेरीत दोघांमध्ये टक्कर होऊ शकते. अंडर-19 आशिया चषक स्पर्धा 1989मध्ये सुरू झाली. आतापर्यंत एकूण आठ हंगाम सामने खेळले गेले आहेत. विशेष म्हणजे भारताने सात वेळा विजेतेपद पटकावले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संघ प्रत्येकी एकदा जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरले आहेत. 2012मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळलेला अंतिम सामना बरोबरीत सुटला होता. या कारणास्तव दोघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. 2013-14मध्ये झालेल्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तान संघाचा 40 धावांनी पराभव केला होता.

-आशिया कपमध्ये भारताचे सामने

23 डिसेंबर ः भारत विरुद्ध यूएई

25 डिसेंबर ः  भारत विरुद्ध पाकिस्तान

27 डिसेंबर ः भारत विरुद्ध अफगाणिस्तान

30 डिसेंबर ः सेमीफायनल

31 डिसेंबर ः फायनल

भारतीय संघ-हरनूर सिंह पन्नू, अंगक्रिश रघुवंशी, अंश गोसाई, एसके रशीद, यश धुल (कर्णधार), अनेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधू, दिनेश बाना (विकेटकीपर), आराध्य यादव (विकेटकीपर), राजंगद बावा, राजवर्धन हैंगरगेकर, गर्व सांगवान, रवी कुमार, रिशिथ रेड्डी, मानव पारख, अमृत राज उपाध्याय, विक्की ओस्तवाल.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply