Breaking News

भारत-आफ्रिका पहिली कसोटी दर्शकाविना?; ओमायक्रॉनमुळे तिकिट विक्रीच नाही

सेंच्युरियन ः वृत्तसंस्था

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे, मात्र या सामन्यापूर्वीच क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. सेंच्युरियन येथे खेळल्या जाणार्‍या बॉक्सिंग डे कसोटीत प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही. एका अहवालातून ही बाब समोर आली आहे. अहवालानुसार क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने ओमायक्रॉनचे संकट पाहता तिकिटांची विक्री केलेली नाही. वृत्तानुसार या सामन्यासाठी काही प्रतिनिधींना मैदानावर जाण्याची परवानगी दिली जाईल. दक्षिण आफ्रिकेतील कोविड-19 निर्बंधांमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट मालिकेदरम्यान दोन हजार प्रेक्षकांना मैदानावर जाण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची बातमी यापूर्वी आली होती. तेव्हा ओमायक्रॉनच्या प्रकरणात घसरण आली तर दर्शकांची संख्या वाढेल असे सांगण्यात आले. स्टेडियमच्या ट्विटर हँडलवर माहिती देण्यात आली आहे की, दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात इम्पीरियल वांडरर्स स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्रेक्षक येतील की नाही हे सध्या स्पष्ट नाही. या संदर्भात पुढील घोषणा करण्यात येईल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत पोहचलेल्या भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी येथे सराव सुरू केला आहे. आफ्रिकेला जाण्यापूर्वी टीम इंडियाला मुंबईत क्वारंटाइन करण्यात आले होते. भारतीय संघ आठव्यांदा दक्षिण आफ्रिकेचा दौरा करीत आहे. जगातील हा एकमेव देश आहे जिथे भारतीय संघ अजूनही कसोटी मालिका जिंकलेला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दुसर्‍यांदा दक्षिण आफ्रिकेत गेलेली टीम इंडिया या वेळी नक्कीच इतिहास रचेल अशी सर्वांना आशा आहे. भारतीय संघाला येथे तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिकाही होईल. भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्मा सध्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर आहे. त्यामुळे के. एल. राहुलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply