खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ढेकू गावच्या हद्दीत मका भरलेला ट्रक उलटल्याने काही काळ वाहतूक बाधीत झाली, मात्र अपघातग्रस्त ट्रक बाजूला केल्यानंतर मुंबईकडे जाणार्या दोन लेन वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याचे बोरघाट वाहतूक केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मरागजे यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईकडे जाणार्या लेन वर किमी 37/ 700 जवळ मका भरलेला ट्रक उलटल्याने, रस्त्यावर सर्वत्र मक्याचे दाणे पसरले, त्यामुळे मुंबई दिशेची वाहतूक बाधीत झाली, सदर चा अपघात 3. 30 च्या दरम्यान घडला ,सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी नसल्याचे सांगण्यात आले, आता वाहतूक सुरळीत होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलीस करीत आहेत.