Breaking News

भाजपच्या वतीने पेणकरांना सूरमयी भेट

पेण : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष पेण शहराच्या वतीने मंगळवारी (दि. 25) दिवाळी सणानिमित्त सुमधुर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायक संतोष पाटील व त्याचे सहकारी जगदीश पाटील, विद्या जोशी-शिवलिंग, अश्विनी म्हात्रे यांच्या सुश्राव्य गीतांनी या कार्यक्रमात रंगत आणली. पेणच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही. विकासकामे यापुढेही सुरूच राहणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी एकत्र राहावे व गुण्यागोविंदाने सण साजरे करावेत, असे आवाहन करून आमदार रविशेठ पाटील व माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी या वेळी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पेणच्या माजी उपनगराध्यक्षा वैशाली कडू, भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, ज्योती म्हात्रे, माजी नगराध्यक्ष रघुनाथ बोरेकर, माजी उपनगराध्यक्ष दिलीप लाड, माजी सभापती प्रकाश पाटील यांच्यासह रसिकश्रोते या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply