Breaking News

उरण तालुक्यात पूरस्थिती

चिरनेर, कंठवली, रांजणपाडा व जसखारमध्ये नुकसान

उरण ः प्रतिनिधी

मागील 15 दिवस सतत कोसळणार्‍या पावसाने अक्षरशः संपूर्ण उरण तालुक्याला झोडपले असून शनिवारी मध्यत्रीपासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे चिरनेरमधील मध्यवर्ती नाल्याला प्रचंड पूर आल्याने चिरनेरमधिल सखल भागातील घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने जनतेचे अतोनात नुकसान झाले आहे.नागरिकांच्या सर्व चीजवस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने पूरग्रस्त जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे.

चिरनेर गावाच्या मध्यवर्ती भागातून वाहणार्‍या नाल्याला डोंगरातून येणार्‍या पाण्यामुळे दरवर्षी पूर येतो. मात्र या परिस्थितीवर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने आज मध्यरात्री पासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे या नाल्याला पूर आला.पहाटेच्या साखरझोपेत असणार्‍या जनतेची अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळे त्रेधातिरपीट उडाली  तसेच कंठवली गावात शिरले होते.त्यामुळे घरातील उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. तर जासई-रांजणपाडा येथिल शेतजमिनीवर मागील वर्षी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या माती आणि ब्रीजच्या भरावामुळे पाणी निचरा होण्याचे मार्ग शिल्लक

राहिले नाहीत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply