Breaking News

म्हसळा शहरात ताडगोळे दाखल

आयुर्वेदिक औषधी गुण, ग्राहकांकडून मागणी वाढली

म्हसळा : प्रतिनिधी

आलिबाग तालुक्यातील ताडगोळे म्हसळा शहरांत दाखल झाले आहेत. रसाळ, चविष्ट ताडगोळ्यांना आर्युवेदात औषध म्हणून विशेष महत्त्व असल्याने जास्त दर असूनही त्याचा खप मोठ्या प्रमाणात होत आहे.

म्हसळा शहरांत पूर्वी ताडगोळे काढून रेवदंडा परिसरांतून आलेल्या माळणी विकत असत. आज मात्र अलिबाग तालुक्यातील नवगावचे वरदान घरत हे कठिण आवरणाचे ताजे ताडगोळे ग्राहकांना सालासकट थेट कापून देत आहेत. आशा पद्धतीचे ताडगोळे म्हसळा बाजारात प्रथमच आल्याने त्यांनी भावही छान खाल्ला.

आवरणातून बाहेर काढलेला ताडगोळा फारसा टिकत नाही. साल काळी पडत जाते आणि गरही आंबूस होत जातो. नुकत्याच उतरवलेल्या फ़ळातून काढलेल्या ताडगोळ्याची चव मात्र अप्रतिम लागते.

ताड हा वृक्ष अ‍ॅरॅकेसी कुळातील असून त्याचे शास्त्रीय नाव बोरॅसस फ्लॅबेलिफर आहे. शिंदी, खजूर, माड (नारळ) या वनस्पतींही अ‍ॅरॅकेसी कुळातील आहेत

-बाळकृष्ण गोरनाक, वनस्पती विषयक आभ्यासक, म्हसळा

ताडगोळे व त्यात असणारे चमचाभर पाणी हे, मूत्र विकार व शरिरातील उष्णतेची तीव्रता कमी करण्यासाठी फार उपयोगी आहे. ते घेतल्याने दाहयुक्त रोगाचे नियंत्रण होते.

-श्री. दफेदार, झाडपाला अभ्यासक, म्हसळा

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply