Breaking News

बांगलादेशी घुसखोरांना मदत? मालेगावातील ’ते’ दोन आमदार संशयाच्या भोवर्‍यात; विघातक षडयंत्राची कसून चौकशी करा -भातखळकर

मुंबई : प्रतिनिधी

बांगलादेशी घुसखोरांना बेकायदेशीररित्या भारताचे नागरिकत्व मिळवून देणार्‍या एका टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला असून, त्यांच्याकडे महाराष्ट्रातील एमआयएम व काँग्रेसच्या आमदारासह एकूण सात आमदारांची स्वाक्षरी असलेली लेटरहेड मिळाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा प्रकार धक्कादायक असून, देशविघातक कृत्यासाठी या आमदारांना 24 तासांच्या आत अटक करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुंबईतील साकीनाका पोलिसांनी पकडलेल्या टोळीकडून जी माहिती तपासात पुढे आली ती गंभीर आहे. या टोळीने एमआयएमचे मालेगावातील आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माइल आणि काँग्रेसचे आमदार शेख आसिफ शेख रशीद तसेच अन्य पाच आमदारांच्या लेटरहेडचा वापर करून मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद यासह देशातील विविध शहरांमध्ये बांगलादेशींना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्यासाठी बनावट सरकारी दस्तावेज तयार करण्याचे काम केले आहे. या टोळीकडे या दोन आमदारांची सात कोरी लेटरहेडसुद्धा मिळाली आहेत, असे नमूद करीत अतुल भातखळकर यांनी या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित केले आहे.देशाच्या सार्वभौमत्व व सुरक्षेशी अत्यंत धोकादायक खेळ करणार्‍या देश विघातक षडयंत्राची कसून करा, देशद्रोह्यांना अटक करा अशी मागणी करीत लाचार ठाकरे सरकार हे प्रकरण खणून काढेल काय, असा प्रश्न आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply