खारघर : रामप्रहर वृत्त
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवीन वर्षाचे स्वागत स्वच्छता मोहीम घेऊन करणार असल्याचे नगरसेविक निलेश मनोहर बाविस्कर यांनी कळविले होते. त्याप्रमाणे परिसरातील नागरिकांनी शनिवारी (दि. 1) सकाळी 7 वाजता आयोजित केलेल्या स्वच्छता मोहीमेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
नागरिकांनी एकत्र जमून घरकुल स्पॅगेटी खळाचे मैदान व त्या परिसराची स्वच्छता केली. या वेळी भाजप वॉर्ड अध्यक्ष आनंद मोकाशी, विश्वनाथ ईण्डी, भाजप उत्तर भारतीय समितीचे वॉर्ड अध्यक्ष कनकलता सिंह, विकल कांबळे, घरकुल फेडरेशनचे अध्यक्ष मोहीतेजी, दुर्गामाता फेरीवाला संस्थेचे सचिव मनोज पाटील, मुकेश र्गग, कोलापूर संस्थेचे सदस्य भरत मकदुम, मनोज बंगेरा, अजय सिंह, जोगा विजय आदी उपस्थित होते.
खारघर : येथील घरकुल स्पॅगेटी युवा भीम संगटना आणि समता मित्र मंडळातर्फे भीमा-कोरेगाव येथे जाणारांसाठी सेक्टर 15 घरकुल स्पॅगेटी येथून मोफत बससेवा देण्यात आली. ही बससेवा नगरसेवक नीलेश बाविस्कर यांच्या प्रयत्नाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून देण्यात आली होती. या वेळी आनंद मुदगल, तुषार गायकवाड, सुशीलकुमार बनसोडे, सलिल मोरे, दिलीप फुलोरे, गौरव मोरे, शंतनु कदम, दिलीप खंडारे, तेजस वाघमारे आदी उपस्थित होते.