पनवेल ः रामप्रहर वृत्त
सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 18, 19 आणि
20व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय या सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी (दि. 5) सायंकाळी 4 वाजता खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात (स्वायत्त) होणार आहे.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर असणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी व साहित्यिक रामदास फुटाणे, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे, ललित मासिकाचे स्तंभलेखक रविप्रकाश कुलकर्णी, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याचा साहित्यप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव परेश ठाकूर, संयोजक दीपक म्हात्रे आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष विष्णू सोनावणे यांनी केले आहे.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …