Breaking News

खालापूरात रासायनीक कचरा उघड्यावर

खोपोली : प्रतिनिधी

उघड्यावर टाकण्यात आलेल्या रासायनीक कचर्‍यामुळे  दोघेजण भाजल्याची घटना खालापूरात घडली असून, त्यापैकी एक जण खोपोलीतील खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहे.

खालापूर तालुक्यातील धामणी गावाच्या हद्दीत नवनीतलाल कारखान्याच्या प्रवेशव्दाराजवळ मोकळ्या जागेत अज्ञातांनी  मोठ्या प्रमाणात रासायनीक कचरा टाकला आहे. काळ्या मातीसारखा दिसणार्‍या या रासायनिक कचर्‍याच्या ढिगानजीक असलेल्या पायवाटेने दोन कामगार चालत जात होते. त्यांच्या पायाला  गरम  चटके बसले. यातील एक कामगार धामणी गावातला तर दूसरा परप्रांतिय कामगार सध्या खालापूर येथे राहतो. या दोनही कामगारांच्या पायाला दुसर्‍या दिवशी फोङ आले. धामणीतील कामगार उपचारानंतर सध्या घरी असून, परप्रांतीय कामगारावर अद्यापही खोपोलीतील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हा रासायनीक कचरा कोणी आणून टाकला याबाबत नवनीतमधील सुरक्षा रक्षकांना माहिती नसून रात्रीच्या वेळेस हा प्रकार घङला असावा, असे सांगण्यात येत आहे. दोघेजण भाजल्यानंतर आणखी दुर्घटना घडू नये, यासाठी त्याठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. पावसाळ्यात  मातीसारखा दिसणारा हा रासायनीक कचरा पाण्याबरोबर वाहत शेतजमीन, नदित जाण्याची शक्यता आहे.

-सदरचा रासायनीक कचरा कोणी टाकला, याबाबत माहिती घेण्यासाठी संबधित भागाचे तलाठी, ग्रामसेवक यांना सूचना देण्यात येतील. ग्रामपंचायतीनेदेखील घडलेल्या प्रकाराची तक्रार करणे आवश्यक आहे.

-इरेश चप्पलवार, तहसिलदार, खालापूर

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply