धाटाव ः प्रतिनिधी
रोहा तालुका क्रीडासंकुलात नुकत्याच घेण्यात आलेल्या सोनारसिद्ध क्रिकेट स्पर्धेत औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सुदर्शन कंपनीने प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे कंपनीतर्फे सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या वेळी कंपनीचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट विवेक गर्ग यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले, तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास कंपनीच्या डीजीएम माधुरी सणस, एचआर विभाग प्रमुख शांताराम सोनावणे, आयआर विभाग प्रमुख हेमंत तेजे, जनसंपर्क अधिकारी अॅड. विशाल घोरपडे, रवी दिघे, संघ व्यवस्थापक समीर वाढवळ, आकाश वर्मा, सीएसआर विभागाचे रूपेश मारबते उपस्थित होते.