वानरलिंगी सुळक्यावर आदरांजली वाहून फडकविला तिरंगा
सुधागड ः प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच निधन झाले. सुधागड तालुक्यातील मॅकविला द जंगल यार्डमधील साहसी प्रस्तरारोहकांनी पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील वानरलिंगी हा 400 फूट सुळका सर करून ‘अनाथांची माय’ सिंधुताईंना भावपूर्ण आदरांजली आणि गिर्यारोहण मानवंदना देण्यात आली तसेच भारताचा झेंडा फडकवण्यात आला.
या मोहिमेत सुधागड तालुक्यातील प्रस्तरारोहक व मॅकविला द जंगल यार्डचे संस्थापक मॅकमोहन हुले आणि त्यांचे सहकारी प्रणय पाटील, अभिजीत राजगुरू व विकी घोडके सहभागी होते. त्यांनी 7 जानेवारी रोजी चार तासांत वानरलिंगी सुळका सर केला व तेथे सिंधुताईंना अनोखी श्रद्धांजली व गिर्यारोहण मानवंदना दिली.
सिंधुताईंचे कार्य महान आहे. त्यांच्या जाण्याने अनाथांची माय हरपली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्यांच्या देदीप्यमान कार्याला सलाम करण्यासाठी ही अनोखी मानवंदना देण्यात आली.
-मॅकमोहन हुले, संस्थापक, मॅकविला द जंगल यार्ड