पनवेल : रामप्रहर वृत्त
उलवे नोड तमिळ संगम फाऊंडेशनच्या वतीने सेक्टर 19मध्ये पोंगल उत्सव 2022 आयोजित करण्यात आला होता. या उत्सवास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तमिळ संगम फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी पोंगल उत्सव साजरा केला जातो. यंदाचे हे सहावे वर्ष होते. या कार्यक्रमास भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते शरद खारकर, अमर म्हात्रे, शैलेश भगत, निलेश खारकर, ग्रामपंचायत सदस्य वितेश म्हात्रे, नंदकुमार ठाकूर, महिला मोर्चा उपाध्यक्ष समृद्धी अडसुळे, प्रिया मॅडम, अम्मा इंटरप्रायझेसचे संचालक व्ही. राजा, भाजप साऊथ सेलचे अध्यक्ष मसानम, उपाध्यक्ष कृष्णन, उलवे नोड तमिळ संगम फाऊंडेशनचे अध्यक्ष पेनिअल एस., उपाध्यक्ष अल्लाबक्ष, सचिव सुगुमार एम., खजिनदार सेल्वराज नैनार, समन्वयक मसानम राजराथनम, सहसचिव गणेश. एस., बालन मोहन, सल्लागार संकरा नारायणम, राजेंद्रन पी., राजेंद्रन जी. एफ., दिनकरन पी., टी. पी. राजू यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी तमिळ संगम फाऊंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले तसेच पोंगल सणानिमित्त नागरिकांना लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते अन्नधान्य देण्यात आले.
Check Also
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper