केपटाऊन ः वृत्तसंस्था
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी कसोटी 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये सुरू होणार आहे. या मालिकेत आतापर्यंत दोन सामने झाले असून उभय संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे तिसरी व शेवटची कसोटी निर्णायक ठरणार आहे.
भारतीय संघ दोन दिवस अगोदरच केपटाऊनमध्ये दाखल झाला असून सरावालाही सुरुवात केली आहे. तिसर्या कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आली आहे. नियमित कसोटी कर्णधार विराट कोहली संघात पुनरागमन करणार आहे. पाठीच्या वरच्या भागात दुखापत झाल्यामुळे कोहलीला दुसर्या कसोटीतून बाहेर पडावे लागले होते.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही कोहली तिसर्या कसोटीत पुनरागमन करेल, असे संकेत दिले आहेत. द्रविड यांनी व्हर्चुअल पत्रकार परिषदेत सांगितले की, विराट कोहली पूर्णपणे ठीक झाल्याचे दिसत आहे, तर कर्णधार विराट कोहलीने मोहम्मद सिराजच्या दुखापतीबाबतही अपडेट दिले. त्याने सांगितले, सिराज फिट नाही. आम्ही त्याच्या जागी संघात कोणाचा समावेश करायचा हे ठरवू. आमच्याकडे बरेच पर्याय आहेत.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …