Breaking News

पनवेल मनपा मागासवर्गीय कल्याण समितीची बैठक

समाजाच्या उन्नतीसाठी विविध उपक्रमांबाबत चर्चा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या मागासवर्गीय कल्याण समितीची बैठक शुक्रवारी (दि. 14) आयोजित करण्यात आली होती. महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयातझालेल्या या बैठकीत मागासवगीर्र्य समाजाच्या कायमस्वरूपी उन्नतीसाठी विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांमध्ये मागासवर्गीय कल्याण समितीची बैठक घेता आली नव्हती. त्यामुळे शुक्रवारी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, आरती नवघरे, एकनाथ गायकवाड, महादेव मधे, उपायुक्त तृप्ती सांडभोर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मागासवर्गीय समाजाच्या कायमस्वरूपी उन्नतीसाठी एखादा उपक्रम राबवला जावा अशी मागणी करण्यात आली. ही मागणी मान्य करण्यात आली, तसेच नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठे, खारघर या ठिकाणी सिडकोकडून एक प्लॉट घेण्याचे ठरवण्यात आले. या प्लॉटवर इमारत उभारण्यात येणार असून या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी, तसेच महिलांसाठी स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply