पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीत सुरू असलेल्या विविध कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 25) पाहणी केली आणि अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
पनवेल कोळीवाडा येथील पकटीजवळ महापालिकेच्या माध्यमातून शौचालय बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 19मधील गुजराथी स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाहणी केली. या वेळी नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, अधिकारी श्री. कर्डिले, मंगेश पिळविलकर उपस्थित होते.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper