Saturday , June 3 2023
Breaking News

जागतिक कर्करोग दिनानिमित्त व्याख्यान

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञाान महाविद्यालयातीलमहिला विकास कक्षार्फे शुक्रवार (दि. 4) जागतिक कर्करोग दिनानिमित्त महिला आरोग्य व कर्करोग जागरूकता या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी डॉ. गौरी जोशी या प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होत्या. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उददेश कर्करोगाच्या गंभीर आणि जीवघेण्या आजाराबाबत जनजागृती करणे आणि या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना मदत करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे हा आहे. डॉ. गौरी जोशी यांनी आपल्या व्याख्यानातून महिलांना कर्करोग या गंभीर आजारापासून सुरक्षित कसे राहता येईल. याबाबत जागरुकता निर्माण केली.

या वेळी महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. संजय मराठे यांनी विद्यार्थ्यांमध्ये कर्करोगा विषयी जागरुकता निर्माण करणे हे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. अंकिता जांगिड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिले. प्रा. सानिया नाचन यांनी अतिथींचे व उपस्थितांचे स्वागत केले. तसेच आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रा. मानसी शाह व प्रा. स्नेहा चोगले यांनी सहकार्य केले.

संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कर्करोगविषयी जागरुकता निर्माण केल्याबद्दल आयोजकांची प्रशंसा केली तसेच संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिध्देश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply